बंगाली समाजाच्यावतीने दैवज्ञ बोर्डिंगमध्ये दुर्गादेवीची स्थापना
schedule03 Oct 22 person by visibility 544 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :– कोल्हापूर येथील बंगाली समाजाच्यावतीने दैवज्ञ बोर्डिंग कुमारी पूजा, संधी पूजा आणि आरती करून दुर्गादेवीची आराधना करण्यात आली.
कोल्हापुरात व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या बंगाली समाच्या वतीने येथील दैवज्ञ बोर्डिंग येथे सार्वजनिक श्री श्री दुर्गापूजा उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून दुर्गादेवीची उपासना केली जाते. त्याच अनुषंगे शनिवारी (ता. १) महाषष्ठीला घटस्थापना, मूर्तीपूजेने उत्सवास सुरवात झाली. १२ फूट उंच असणाऱ्या या मूर्तीसाठी माती कोलकता येथून आणली आहे. मूर्ती साकारणारे कलाकारही तेथीलच आहेत. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये आज पूजा, होमहवन, कुमारी पूजन आणि संधी पूजा झाली.
बुधवारी (ता. ५) दसऱ्याला दुपारी १२.३० ला मूर्तीचे विसर्जन होईल. त्या अगोदर सिंधुर उत्सवाचे आयोजन केले आहे.
बिश्वजित प्रामाणिक, संदीप मंडल, इंद्रजित सामंत, आशीष मंडल, देवाशीष देरिया, राजकुमार गुच्छाईत, मानस मिड्डा यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सहयोगातून उत्सवाचे नियोजन केले जात आहे.
दरम्यान, कोलकता येथील दुर्गा उत्सवाप्रमाणे आकर्षक अशी सजावट आणि मांडणी केली आहे.