Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आम्ही पाहिलाय काळ तुमच्या संघर्षाचा…म्हणूनच अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !! अमल महाडिकविवेकानंद  कॉलेज  कुशल मनुष्यबळ घडविणारे लोकप्रिय महाविद्यालय-प्राचार्य आर. आर. कुंभारविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली मेन राजाराम हायस्कूलला भेटअन् छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजळलाभाजपा कार्यकर्त्यांचा मिरजकर तिकटीला जल्लोषकोल्हापुरात बहरणार ५४ वे पुष्प प्रदर्शन ! महावीर उद्यान येथे विविध कार्यक्रम !!शहाजी कॉलेजच्या खेळाडूंचे विद्यापीठ आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यश  पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप सातारा-कोल्हापूर पुरुष गटाला विभागूनफोंडाघाटत टँकरला आगविधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस ! मुंबईत घोषणा, कोल्हापुरात आनंदोत्सव !!

जाहिरात

 

वैद्यकीय क्षेत्रातून सेवाभाव, मानवतावादासह व्यापक नेतृत्व गुणांची प्रेरणा -जनरल मनोज नरवणे

schedule19 Oct 24 person by visibility 191 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  क्षेत्र कोणतेही असो त्या ठिकाणी प्रभावी नेतृत्व आवश्यक असते.  मौल्यवान नेतृत्व कौशल्यांमध्ये निर्णय क्षमता, प्रेरणा देण्याची आणि प्रभावीपणे संवाद शैली समाविष्ट असते. सैन्य दलासह वैद्यकीय क्षेत्रातूनही  नेतृत्व गुण विकसित होतात. सेवाभाव, मानवतावादी दृष्टीकोनसह व्यापक नेतृत्व गुणांची प्रेरणा मिळते’असे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केले. 
  कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित दोन दिवसीय केएमए काॅन २०२४ या वैद्यकीय परिषदेला शनिवारी सुरुवात झाली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  त्यांनी,  ‘नेतृत्व गुण आणि त्याचे नियोजन ' याविषयी  मार्गदर्शन केले.  हॉटेल सयाजी येथे आयोजित या परिषदेला ५०० हून अधिक डॉक्टर्सची उपस्थिती आहे. याप्रसंगी वैद्यकीय व नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शरद भुथाडिया यांचा सत्कार करण्यात आला. 
नरवणे म्हणाले, ‘नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये सहानुभूतीशीलपणा, निस्वार्थीपणा, निर्णय घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. यामुळे इतरांच्या कार्यशक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास सक्षम करते. एक सर्जनशील नेता नवीन कामाच्या वातावरणात सकारात्मकता आणतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची उन्नती होते आणि त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळते. विविधता, एकता आणि समानता या त्रिसुत्रीने सारा समाज गुंफला आहे. ’
डी.वाय.पाटील कॉलेजचे कुलगुरू डॉ राकेश मुदगल म्हणाले मनाचे आरोग्य हृदयाची संवेदना आणि हाताचे कौशल्य याच्या बळावर आपण निश्चित ध्येय गाठू शकतो तसेच जनसंपर्क हीच आपली संपत्ती आहे. असे प्रतिपादन डॉक्टर मुदगल यांनी केले तसेच डी.वाय.पाटील येथे उपलब्ध असलेल्या स्कील व सिमुलेशन लॅबचा अधिकाधिक डॉक्टरांनी वापर करून कौशल्य विकसित करावे असे आवाहन देखील यावेळी डॉ. राकेश मुदगल यांनी केले.
एक चांगला डॉक्टर समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो नवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण अशा प्रकारच्या वैद्यकीय परिषदाच्या आयोजनांमुळे साध्य होते. असे प्रतिपादन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर यांनी केले. "डॉक्टर बीयोंड मेडिसिन ३६०" हे ब्रीदवाक्य घेऊन या वर्षाची केएमए कॉन ही परिषद  होत असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. दीपक जोशी यांनी विशद केले. यावेळी केएमएच्या फ्लॅश या विशेष आवृत्ती स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेच्या सचिव डॉ. सरोज शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. परिषदेच्या सहसचिव डॉ. अर्चना पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. प्रवीण नाईक, डॉक्टर राजेंद्र वायचळ, डॉ .अरुण धुमाळे, डॉ. आशा जाधव, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. किरण दोशी,डॉ.आर.एम. कुलकर्णी, डॉ ए. बी पाटील, डॉ. प्रवीण नाईक, कृष्णा केळवकर,डॉ. प्रसाद तानवडे, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ राजेंद्र चिंचणीकर, डॉ. विनय चौगुले, डॉ. बसवराज कडलगे, डॉ. उन्नती सबनीस, डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. प्रवीण वडगावे, डॉ. महावीर मिठारी, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ.शीतल पाटील  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes