शिवसेनेत इनकमिंगचा धडाका, दहाहून अधिक नगरसेवकांचा आज प्रवेश
schedule05 Nov 25 person by visibility 8 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना इनकमिंगचा धडाका लावला आहे. यामध्ये आघाडी घेतली आहे, शिवसेनेने. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (पाच नोव्हेंबर २०२५) कोल्हापुरात होणाऱ्या मेळाव्यात कोल्हापुरातील दहाहून अधिक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. यामध्ये माजी महापौर, स्थायी समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवकांचा सहभाग आहे. स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पोवार, माजी नगरसेवक रामचंद्र भाले, रत्नेश शिरोळकर, अजय इंगवले, नेपोलिनय सोनुले, विचारेमाळ येथील शुभांगी भोसले आदी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करत आहे. महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाईल असे महायुतीतील साऱ्या नेते मंडळींनी स्पष्ट केले आहे मात्र महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्याकडून स्वतंत्रपणे इनकमिंग होत आहे.