भारत येणाऱ्या काळात परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल - डॉ एस महेंद्र देव
schedule27 Nov 25 person by visibility 43 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : - कृषी, उद्योग, सेवा व शिक्षण, आरोग्य कौशल्य या विषयावर दीर्घकालीन उपायोजना करण्याचे काम सुरू आहे यामुळे भारत नजीकच्या काळात परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असे मत पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव यांनी व्यक्त केले
छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन व रिसर्च अर्थातच सायबर
महाविद्यालयातर्फे कै. डॉ. ए. डी.शिंदे स्मृती व्याख्यान प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेचा भूतकाळ, वर्तमान, आणि भविष्य या विषयावर संवाद आयोजित केला होता. याप्रसंगी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष देव यांनी वरील उद्गार काढले. त्यांनी आपल्या भाषणात आर्थिक वाढीचा आढावा घेऊन 1991 नंतरच्या झालेल्या विविध सुधारणा याविषयी सविस्तर विवेचन केले.
विशेषतः भारत 2047 पर्यंत विकसित देशांच्या श्रेणीत पोहोचण्याचे लक्ष ठेवत आहे. यासाठी जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही आव्हाने आणि संधी आहेत. सध्या राजनैतिक तणाव, युद्ध, व्यापार शुल्क,प्रचंड कर्ज, जागतिक मंदीचा धोका आणि हवामान बदल या सर्व स्तरावर लढा देणे जिकिरीचे आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी भारतामध्ये परदेशी गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक व निर्यात वाढ होणे गरजेचे असून विशेष करून श्वास्वत शेतीवर भर देणे क्रम प्राप्त आहे. भारत जगातील सर्वात मोठा दूध,कापूस, कडधान्य उत्पादक आहे. तथापि तांदूळ, गहू व ऊस या पिकांना अतिरिक्त पाणी वापरले जाते. यासाठी काही पीक पद्धतींमध्ये भौगोलिक दृष्ट्या पीक पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.
विशेष करून कृषी, उद्योग, सेवा व शिक्षण, आरोग्य कौशल्य या विषयांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे काम चालू असून भारत येणाऱ्या काळात परिवर्तनाच्या निर्णयाक टप्प्यावर झेप घेईल असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायबर संस्थेचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉ. टी.व्ही.जी.सरमा यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार मानचिन्ह व करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती देऊन सायबर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.आर.ए.शिंदे यांनी केला. प्रा. मधुरा माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुराधा गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. ज्ञानदेव तळूले यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास सायबर संस्थेचे सचिव सीए. ऋषिकेश शिंदे, विश्वस्त डॉ.बी.एम.हिलगे, रणजीत पाटील, आर. ए. लटके, श्रीमती व्ही.व्ही. उपाध्ये उपस्थित होते.