तपोवन मैदानावर पाच डिसेंबर पासून सतेज कृषी प्रदर्शन
schedule27 Nov 25 person by visibility 37 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी वाय पाटील ग्रुप, महाराष्ट्र सरकार कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पाच ते आठ डिसेंबर 2025 या कालावधीत सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे. येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन होणार आहे अशी माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली
या चार दिवसीय प्रदर्शनामध्ये पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञाकडून मार्गदर्शन, तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांचे उत्पादने व शेतकऱ्यासाठी तंत्रज्ञान, नवीन अद्यावत मशिनरी यांची माहिती एका छताखाली मिळणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, दोन धान्य महोत्सव असणार आहे. 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग आहे. 150 पेक्षा अधिक पशुपक्षी असतील. तसेच फुलांचे प्रदर्शन व विक्री, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल लहान मुलांसाठी ॲमयुझमेंट पार्कचा समावेश आहे.
गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी हे प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. पत्रकार परिषदेवेळी संयोजक विनोद पाटील , सुनील काटकर, धीरज पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, विभागीय संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, कृषी विभागाचे उपसंचालक नामदेवराव परीट, जिल्हा परिषदेच्या पशु विभागाचे अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, प्रकाश साळुंखे, डी. डी. पाटील, महादेव नरके आदी उपस्थित होते