Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मतदार यादीत निष्काळजीपणा नको, यंत्रणा सक्षम करा : आमदार क्षीरसागरांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचनाभारत येणाऱ्या काळात परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल - डॉ एस महेंद्र देवतपोवन मैदानावर पाच डिसेंबर पासून सतेज कृषी प्रदर्शनकोल्हापूर चित्पावन संघातर्फे आपत्तीग्रस्तांना मदतचंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारताने शोधले - इस्त्रोतील शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. शर्माविभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजराकास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरणलिंगायत माळी समाजाचा चौदा डिसेंबरला  राज्यस्तरीय वधू वर मेळावा  महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम, हरकतीसाठी मुदत वाढवलीमहाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार परिणय फुके, सचिवपदी निरंजन गोडबोले ; कोल्हापूरचे भरत चौगुले खजिनदार* 

जाहिरात

 

मतदार यादीत निष्काळजीपणा नको, यंत्रणा सक्षम करा : आमदार क्षीरसागरांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

schedule27 Nov 25 person by visibility 42 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : अंतिम मतदार यादी तयार करताना कोणत्याही नागरिकावर, उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करून यंत्रणा सक्षम करा. यापुढे अंतिम मतदार याद्यांबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका, अशा सूचना  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. तसेच अंतिम मतदार यादीत चुक झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यांसह, बीएलओंवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गुरुवारी महापालिकेमध्ये मतदार मतदार यादी हरकतींचा आढावा आमदार  क्षीरसागर यांनी घेतला.

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मतदार याद्यांमधील हरकतींच्या दुरुस्तींचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मतदार याद्या दुरुस्त करण्याबाबत गांभीर्याने सूचना दिल्या आहेत. यादीमधील घोळ ही गंभीर बाब आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास, संबंधीतांवर जबाबदारी निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते. आमदार  क्षीरसागर म्हणाले, प्रारुप मतदार यादी तयार करताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. या तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे. मतदार याद्यांचे काम जलद गतीने करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करा. अधिकारी आणि बीएलओ यांचे प्रशिक्षण घ्या. प्रभागांशी संबधित अधिकारी आणि बीएलओ यांची यादी जाहीर करा. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या तक्रारींबाबत संपर्क साधणे सहज शक्य होईल. दोन प्रभागांच्या बॉर्डरवरील नावांमध्ये मोठ्या प्रमाणत फेरबदल झाला आहे. हे जलदगतीने दुरुस्त करा. अंतिम मतदार यादी बिनचूक करावी अशा सुचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या. या यादीमध्ये चुका होवून कोणत्याही नागरिकावर, उमेदवारावर अन्याय झाल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ १०० कंट्रोल चार्ट नवीन करण्यास सांगितले आहे. महापालिकेने स्वतः शहानिशा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे महापालिकेचे अधिकारी स्वतः जागेवर जाउन दुरुस्ती करत आहेत. तसेच बीएलओंची संख्याही वाढवण्यात आल्याचे सांगितले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकांचे खापर शासन आणि प्रशासनावर नको : 

मतदार याद्यांमधील घोळाचे शासनावर आणि मनपा प्रशासनावर खापर फुटणार नाही, यामुळे कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही आमदार  क्षीरसागर यांनी केल्या. या बैठकीस उपायुक्त शिल्पा दरेकर,  अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अभियंता गवळी, नगररचनाकार एन.एस.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक कमलाकर जगदाळे, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, अजय इंगवले, रमेश पुरेकर, अश्विन शेळके, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, आश्पाक आजरेकर, गणेश रांगणेकर, नेपोलियन सोनुले, अरविंद मेढे, निलेश हंकारे, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes