जुना बुधवार तालीम मंडळाच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ
schedule17 Aug 24 person by visibility 341 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जुना बुधवार तालीम मंडळाच्या इमारतीच्या उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी आमदार जयश्री चंद्रकात जाधव यांनी २५ लाखाच निधी दिला असून इमारत बांधकामाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी खासदार निधी मधून निधी देण्याची घोषणा केली. आमदार जाधव यांच्यासह तालमीचे पदाधिकारी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आल्याबद्दल शाहू छत्रपती यांचा तालमीच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच आमदार जयश्री जाधव यांनी बांधकामास २५ लाखाचा निधी दिल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर महादेवराव आडगुळे व जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालमीला कायम बांधकाममध्ये तांत्रिक मदत करणारे इंजिनिअर संतोष भोसले यांचा सत्कार तालमीचे सेक्रेटरी सुनील शिंदे व रमेश पुरेकर यांनी केला. तालमीचे वकील प्रशांत पाटिल याचं सत्कार संचालक राजू माने व सुशांत महाडिक यांनी केला.आर्किटेक्ट किशोर पाटिल याचं सत्कार विराज पाटील, श्रीधर निकम व संग्राम पाटिल यांनी केला. सुशिल भांदिगरे यांनी स्वागत तर संतोष दिंडे यांनी प्रास्ताविक केले. तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना तालमीचा १८२ वर्षाच्या इतिहासाला उजाळा दिला.
यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, अफजल पीरजादे, इब्राहिम मुल्ला, अनिल पाटील, नेपोलियन सोनूले, गणेश जाधव, राहुल घाटगे, धनाजी दिंडे, प्रवीण हुबाले, रवी सावंत, नंदकुमार पाटिल, इंद्रजित आडगुळे, बाबा दिंडे, धनाजी शिंदे, कपिल नाळे, शशिकांत दिंडे, आनंदराव पाटील, संतोष भोसले, किशोर पाटील, दिलीप पाटिल, रमेश गवळी, दिलीप ठाणेकर, रवी दळवी, सुमित कदम, हेमंत साळोखे, मकरंद स्वामी आदी उपस्थित होते.