+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !!
Screenshot_20240226_195247~2
schedule27 May 23 person by visibility 128 categoryजिल्हा परिषद
*बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्याच हस्ते होईल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : 
कागल तालुक्यातील बिद्री येथे पूर्णत्वास येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी, मंजुरी आणि त्याला अनुषंगिक निधी या सर्व बाबी आमदार हसन मुश्रीफ यांच्याच प्रयत्नातून झाल्या आहेत. आमदार मुश्रीफ यांच्या  हस्तेच या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होईल, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.
 फराकटे यांनी म्हटले आहे, ‘ एनआरएचएम योजनेअंतर्गत बिद्री -बोरवडे, हमीदवाडा, हळदी ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आमदार मुश्रीफ यांनी बृहद आराखड्यामध्ये घालून प्रयत्न केले होते. त्यापैकी बिद्री येथे मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र १८ मार्च २०१८ रोजी निविदा काढून वर्कऑर्डर देण्यात आली होती. दरम्यान; अलीकडेच कोणीतरी जाऊन पाहणी करून आपल्याच प्रयत्नाने झाल्याचा भास निर्माण करीत आहेत. त्यांचा त्यावेळी राजकीय जन्मही झालेला नव्हता.  स्टंटबाजी करणाऱ्यांची दखल घेण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे.