माजी सैनिक आंदोलनाच्या पावित्र्यात, सोमवारी मेडल परत करणार
schedule08 Feb 25 person by visibility 552 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी सैनिकासाठी आरक्षित असलेल्या जागावर इतर उमेदवारांची भरती करण्याचा घाट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने घातला आहे. मागील दोन महिने पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून कोणतीही उत्तरे मिळत नाहीत. यामुळे माजी सैनिकांकरिता नोकरीसाठी आरक्षित जागा धोक्यात येत आहेत. प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी माजी सैनिक हे त्यांना प्राप्त मेडल, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परत करणार आहेत. सोमवारी (१० फेब्रुवारी २०२५) सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार आहे. असा इशारा आजी-माजी सैनिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समीर खानोलकर व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला आहे.