पाडळी खुर्दमध्ये धनुष्यबाणाचेच वारं… सचिन पाटलांचा विजय पक्का ! शिरोली दुमालातील प्रचारफेरीत दुमदुमला नारा !!
schedule05 Feb 26 person by visibility 216 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी, पाच फेब्रुवारी रोजी शिरोली दुमाला येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेमुळे त्यांच्या विजयाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला . प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आयोजित या पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग दिसला.
शिरोली दुमाला गावातून काढण्यात आलेल्या पदयात्रेत युवक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर शिवसेनेच्या घोषणा, धनुष्यबाण चिन्हाचा जयघोष आणि विजयाच्या घोषणा यांनी दणाणून गेला होता. या पदयात्रेमुळे मतदारसंघातील वातावरण पूर्णपणे शिवसेनामय झाल्याचे चित्र दिसून आले.
उमेदवार सचिन पाटील म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून मी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन थेट जनतेशी संवाद साधला. युवक, युवती, महिला व ज्येष्ठ मंडळी यांचे प्रेम आणि पाठिंबा मला लाभला. जनतेचा हा वाढता विश्वास पाहता विरोधक दिशाभूल व वैयक्तिक टीकेचा आधार घेत आहेत. मी वैयक्तिक टीकेच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. विकासाची कामे करणे आणि पुढील विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणे हेच माझे धोरण आहे. जनतेला आता खरे आणि खोटे यातला फरक कळू लागला आहे. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाटील कुटुंबीय गेली ४० वर्षे समाजकारण व राजकारणात कार्यरत असून कार्यकर्त्यांना घडवण्याची परंपरा जपली आहे. “कार्यकर्ते हीच आमची खरी ताकद आहे” या भूमिकेतून पुढे जात भविष्यात आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून विकासनिधी आणू. मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करून पाडळी खुर्द मतदारसंघ जिल्ह्यात आदर्श करण्याचा निर्धार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके म्हणाले, शिरोली दुमाला येथील आजची गर्दी पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्चित दिसत आहे. सचिन पाटील यांनी सरपंच म्हणून केलेले विकासकाम उल्लेखनीय असून ते तरुण पिढीचे सक्षम नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
या पदयात्रेत गोकुळ दूध संघाचे संचालक विश्वास पाटील, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावचे उपसरपंच कृष्णात पाटील, सुभाष पाटील, अनिल सोलापुरे, माधव पाटील, एस. के. पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, रंगराव पाटील, एकनाथ पाटील, बाळासो पाटील, सरदार पाटील, श्रीकांत पाटील, विश्वास कांबळे, बाळासो कांबळे, शिवाजी कांबळे, दत्तात्रय कांबळे, रामचंद्र देशमुख यांच्यासह नागरिकांचा मोठा स्वभाव होता.