+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Apr 24 person by visibility 57 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत अधिकाधिक मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व समर्थ वेगवेगळी शक्कल लढवतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरला सध्या मिसळपे चर्चा हा कार्यक्रम महायुतीच्यावतीने जोरदारपणे सुरू आहे.  रोज वेगवेगळ्या भागात मिसळ पे चर्चा आयोजित करून मतदारांच्या पर्यंत उमेदवाराचे चिन्ह पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे.  लक्ष्मीपुरी मंडलातील उद्यमनगर, यादवनगर, गुजरी येथील कासार गल्ली या  ठिकाणी मिसळ पे चर्चा आणि नमो संवाद हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,  भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, गायत्री राऊत, संगीता खाडे,विशाल शिराळकर, संतोष लाड, कुलदीप गायकवाड, संदीप कुंभार, गिरीश साळोखे, मंगला निपाणीकर, तौफिक बागवान, संदीप व्हडगे, अवधूत भाटे उपस्थित होते.