Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गग छछ गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखतजिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदानभाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार

जाहिरात

 

गग छछ

schedule11 Sep 26 person by visibility 7 categoryसामाजिक

गणेशोत्सवात संभाजीनगर तरुण मंडळ करणार मायमराठीचा गजर ! ए आई मला मराठी शिकव अभियान राबविणार ! !

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उत्सवाला सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाची जोड देत श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाने गणेशोत्सवात नेहमीच वेगळेपण जपले. यंदा, मंडळातर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधत मायमराठीचा गजर होणार आहे. त्या अंतर्गत ‘ आई मला मराठी शिकव ना’ हे अभियान राबवण्यात येणार आहे.’अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अजित सासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 ‘ आई मला मराठी शिकव ना ’ हे अभियान म्हणजे नुसते भाषेच्या बाबतीत नाही तर  मराठी भाषेचा, संस्कृती, इतिहासचा प्रचार, प्रसार, प्रबोधन जतन संवर्धन व "आईने" आपल्या मुलांच्यावर संस्कार करणे असा व्यापक उद्देश आहे. मुलांच्या जडणघडणीत मातृभाषेला अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिकीकरण, इंग्रजी शाळांचे वाढते पेव अशा काळात आईकडून मुलाकडे येणारी मातृभाषा टिकणार आहे असा संदेश देणाऱ्या ‘ए आई मला मराठी शिकव ना’ या नावांनी मंडळातर्फे पुस्तकाची निर्मिती केली आहे. २१ सप्टेंबर २०२६ रोज पुस्तकाचे पहिल्या भागाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच या पुस्तकाचे मोफत वाटप  कर्तुत्वान स्त्रीशक्ती संभाजीनगर परिसरातील माता भगिनींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र दुसरीकडे बंद पडत असलेल्या मराठी शाळांची संख्या पाहिली, तर त्याचा परिणाम फार मोठा समाजमनावर होणार आहे. मराठी भाषा, संस्कृतीला इतिहासाला तसेच सण वार उत्सव रिती रिवाज परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक वारसाला पुढील २५ वर्षात धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर करण्यासाठी मंडळाने ‘ए आई मला मराठी शिकव ना’हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे.

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाला ८० वर्षाची परंपा आहे. मंडळाने प्रारंभापासूनच पर्यावरणपूरक व समाजप्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाची गणेशमूर्ती अतिशय सुंदर सुबक असते. शाडू माती बनविलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.  त्याकरिता नैसर्गिक रंगाचाच वापर केला जातो.  यंदा मंडळाच्या, श्री गणेश आगमन मिरवणूक रविवारी (१३ सप्टेंबर २०२६)  होणार आहे मिवरणुकीची सुरुवात आझाद चौक दत्त भिक्षा लिंग स्थानयेथून माधुरी बेकरी,  खासबाग मैदान,  मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी,  नंगिवल्ली चौक ते संभाजीनगर असा असणार आहे. मिरवणुकीत शहरातील प्रसिद्ध पारंपारिक ढोल पथक "करवीर गर्जना" हे असणार आहे.
मंडळातर्फे गणरायाची प्रतिष्ठापना अतिशय भक्तीमय वातावरण होते. मंडळातर्फे उभारलेल्या "राजमहालाची" प्रतिकृतीमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. गणेशभक्तांची होणारी गर्दी पाहता गणेशमूर्ती १४ सप्टेंबरपासून भाविकांनी अर्पण केलेल्या "सोन्या चांदीच्या अलंकारांनी जडीत असलेली मुर्ती दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे" पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

.....................

 

दोन मंडळे एक झाली….उत्साह दुणावला

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळात काही मतभेद होऊन पंचवीस वर्षा पूर्वी दोन मंडळे तयार झाली ते म्हणजे श्री छत्रपती संभाजी नगर फुटबॉल क्लब या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमजंतीतून मतभेद झाले होते पण मनभेद झाले नव्हते. सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या सुखदुःखात एकत्रपणे काम करत होते सामील होत होते. म्हणून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून २५ वर्षानंतर दोन्ही मंडळांचे एकीकरण झाले. आणि यावर्षी एकच गणपती बसवायचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे यावर्षी उत्सवामध्ये उत्साह वाढला.

…………..

मंडळाची नवीन वास्तू….

श्री. छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची नवीन वास्तू आमदार राजेश क्षीरसागर यांच्या एक कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेली आहे. त्याचा "वास्तुशांती समारंभ" हा "संभाजीनगर उत्सव" म्हणून येत्या काही दिवसात साजरा करण्यात येणार आहे.

.................................................

मंडळाची नवीन वास्तू ...

श्री. छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची नवीन वास्तू आमदार राजेश क्षीरसागर यांच्या एक कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेली आहे. त्याचा "वास्तुशांती समारंभ" हा "संभाजीनगर उत्सव" म्हणून येत्या काही दिवसात साजरा करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes