Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदन

जाहिरात

 

भाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीत

schedule10 Sep 26 person by visibility 27 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मालकीची भाऊसिंगजी रोडवर जागा आहे. या ठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स ( व्यापारी संकुल ) उभारणी प्रस्तावित आहे. दरम्यान ही जागा जिल्हा परिषदेने स्वनिधीतून की बँका अथवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन विकसित करायचे यासंदर्भातील निर्णय १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेची स्थायी समिती व बांधकाम समितीची संयुक्त् सभा यादिवशी होणार असून त्यामध्ये भाऊसिंगजी रोडवरील जागा कशा पद्धतीने विकसित करायची यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडून मान्यतेची मोहोर उमटविली जाईल. २३ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा आहे.

दरम्यान, गुरुवारी ( दहा सप्टेंबर ) बांधकाम समितीची सभा झाली. बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. बांधकाम विभागाशी संबंधित विविध विषयावर चर्चा झाली.  चर्चेत सदस्य इंद्रजीत पाटील, अमरसिंह पाटील, शिरीष देसाई, अमोल चव्हाण, काकासाहेब सावडकर, संभाजीराव पाटणकर, सर्जेराव पाटील पेरीडकर आदींनी सहभाग घेतला. कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान भाऊसिंगजी रोडवरील जागा विकसित करण्यासंबंधी चर्चा झाली. भाऊसिंगजी रोड येथील जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यास यापूर्वीच सदस्यांनी विरोध केला आहे.जिल्हा परिषदेच्या निधीतून अथवा कर्ज घेऊन जागा विकसित करावा असे पर्याय पुढे आले आहेत. यासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी निर्णय होणार आहे. यादिवशी, स्थायी समिती व बांधकाम समितीची एकत्रित बैठक होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes