Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखतजिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदानभाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

जाहिरात

 

'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखत

schedule11 Sep 26 person by visibility 50 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात "पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा" या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शनिवार, १२ आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. या मुलाखतीचे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. उत्सवाचा आनंद आणि आस्था कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर, नैसर्गिक रंगांना प्राधान्य, प्लास्टिकचा वापर टाळणे, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि योग्य व्यवस्थापन, तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे, या बाबी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महत्त्वाच्या आहेत. उत्साह आणि पर्यावरणाची जबाबदारी यांचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जलस्रोतांचे प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन 'दिलखुलास' कार्यक्रमातून केले आहे.

 तसेच गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम तसेच पारंपरिक वाद्यांवर आधारित मिरवणुकांना प्रोत्साहन याबाबत माहिती देण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनासोबत नागरिक, युवक आणि गणेशोत्सव मंडळांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही डॉ. जॅसमिन यांनी सांगितले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes