Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखतजिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदानभाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशा

जाहिरात

 

गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ

schedule11 Sep 26 person by visibility 78 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 'कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महायुती मधील जागा वाटपाचा तिढा सामंजस्याने सुटेल. यासंदर्भात मुख्यमंत्री देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सोबती बोलणे झाले आहे. मुख्यमंत्री मार्ग काढतील.' असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (11 सप्टेंबर 2026 )पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ  तर गोकुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ आहे'  असे स्पष्ट केले.
 भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी गोकुळमध्ये भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ असेल आणि महायुतीमार्फत निवडणूक लढवली जाईल असे म्हटले होते त्या अनुषंगाने पत्रकाराने मंत्री मुश्रीफ यांना प्रश्न केल्यावर ते म्हणाले, ' राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ आहे मात्र गोकुळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ म्हणून राहील. जागा वाटपावरून महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही. जागा वाटपाचा तिढा सामंजस्याने सुटेल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतही बोलणे झाले आहे ते यातून मार्ग काढतील.
गोकुळ दूध संघाचे निवडीत गोकुळ दूध संघाशी निगडित प्राथमिक दूध संस्थेच्या पात्रतेवरून प्रकरण कोर्टापर्यंत गेले. सर्किट बेंचपर्यंत दूध संस्थांनी धाव घेतली. या साऱ्या घडामोडीच्या अनुषंगाने पत्रकारानी प्रश्न केल्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळमध्ये  बहुतांश संचालक महायुतीचे आहेत. मात्र दूध संस्था पात्र-अपात्रतेवरून जे काही घडले, त्याचे उत्तर मलाही मिळालेले नाही.'

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes