मी कृतज्ञ, प्रकुलगुरुपदाच्या कालावधीत खूप काही शिकता आले - डॉ. ज्योती जाधव
schedule22 May 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केवळ शिक्षण आणि संशोधन यापलिकडे न पाहणाऱ्या माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला प्रशासकीय काम करण्याची संधी देऊन शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्रभारी प्र-कुलगुरू होण्याचा मान दिल्याबद्दल मावळत्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी डॉ. सुरेश गोसावी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठ येथे प्रभारी कुलगुरू सुरेश गोसावी यांचा अनौपचारिक निरोप समारंभ आयोजित केला होतो. विद्यापीठाचे नवीन कुलगुरू आर. के. कामत यांनी डॉ. गोसावी यांच्याकडून कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांनाही निरोप देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना जाधव यांनी प्रकुलगुरुपदाच्या काळात खूप काही प्रशासकीय बाबी शिकून घेता आल्या, असेही सांगितले. मावळते कुलगुरू गोसावी यांनी,मनोगत व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय शिस्त ही वाखाणण्याइतकी चोख आहे. वरती अधिकारी कोणीही असला तरी इथला प्रत्येक सहकारी त्याला नेमून दिलेले काम मन लावून करीत असतो. आवश्यक तेथे सूचना देण्यापलिकडे त्यांना वेगळे काही सांगावे लागत नाही. शिवाजी विद्यापीठातील ही कार्यप्रणाली कौतुकास्पद स्वरुपाची आहे. त्यामुळे येथील प्रभारी कुलगुरू पदाचा कालखंड खूप चांगला पार पडला.’अशा भावना व्यक्त केल्या.
कुलसचिव डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर उपस्थित होते.