परप्रांतियांची वैयक्तिक माहिती संकलित करा, आरपीआय गवई गटाची मागणी
schedule22 May 26 person by visibility 10 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात परप्रांतिय कामगारांची संख्या झपाटयाने वाढली आहे. मात्र त्यांची वैयक्तिकरित्या माहिती कोणाकडे संकलित केल्याचे आढळत नाही. अनेकजण वेगवेगळया कंपन्यामध्ये काम करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे करुन काही जण कोल्हापुरात कामाला येत आहे. त्यांच्याकडून गैरकृत्ये घडण्याअगोदरच अशांचा शोध घेणे आवश्यक आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने गावनिहाय परप्रांतियांची माहिती संकलित करावी अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गटातर्फे पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. पोलिस अधिकारी तानाजी सावंत यांना मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात गवई गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे, जिल्हा सरचिटणीस संदीप हेर्लेकर, आप्पासाहेब कांबळे, शामराव भोसले, सुरेश कुरणे, विजय जाधव, प्रवीण शिंदे यांचा समावेश होता.