हटके कोल्हापूर ! मूर्ती दान, निर्माल्य संकलनानंतर आता मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र !!
schedule05 Sep 22 person by visibility 713 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : विसर्जित मूर्ती दान आणि निर्माल्य संकलन या उपक्रम यशस्वीपणे राबवत उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड दिली. नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीत विसर्जित न करता कृत्रिम कुंडात करण्यात येते. कृत्रिम कुंडात विसर्जन झालेल्या सर्व घरगुती गणेश मूर्तींचे पुर्नविसर्जन इराणी खण क्रमांक दोन येथे करण्यात येते. महापालिका प्रशासनाने या संकलित मूर्तीचे सुलभ व योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.
यावर्षीपासून, तंत्रज्ञानाच्या जोडीने या मूर्ती आधुनिक पद्धतीने स्वयंचलित यंत्राद्वारे विसर्जित केल्या. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या यंत्रासाठी निधी उपलब्ध करुन दिला होता.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या यंत्राचे चार सप्टेंबर रोजी उदघाटन करण्यात आले. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, या यंत्राद्वारे खणीत ३५ फूट अंतरापर्यंत विसर्जन करता येत.
विसर्जनासाठी प्रथमच अशा आधुनिक टेलीस्कोपिक कन्व्हेअर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या बेल्टची लांबी कमी-जास्त करता येत असून १८० अंशापर्यंत मशीन फिरू शकते या तंत्रज्ञानामुळे 'एक सेकंदाला एक गणेश मूर्ती विसर्जित' करता येउ शकतात असे प्रशासनाच् म्हणणे आहे. सोमवारी,पाच सप्टेंबर रोजी घरगुती गणेश मूर्ती विसर्जनादिवशी या यंत्रांचा वापर करत मूर्ती विसर्जित केल्या.