Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथआरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! ! राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागरश्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटनकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सेवेतून कार्यमुक्तीची कारवाईइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थआता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे

जाहिरात

 

आरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! !

schedule26 Feb 26 person by visibility 99 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरात आरोग्यसेवेचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. सार्वजनिअ आरोग्य विभागाच्या पुढाकारातून ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे व कोल्हापुरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या अभियान अंतर्गत एक हजार शस्त्रक्रिया होणार आहेत. यासाठी रोटरी क्लब या स्वयंसेवी संस्थेचे मोठे सहकार्य लाभले आहे.

कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी पत्रकार परिषदेत मोफत शस्त्रक्रिया अभियानची माहिती दिली. जिल्ह्यातील पाच सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामध्ये हार्निया, अपेंडिक्स मोतीबिंदू, काचबिंदू, प्रोस्टेट, टॉन्सिल, अॅडेनोइट ग्रंथी, कानाच्या पडद्याशी संबंधित शस्त्रक्रिया, थायरॉईड, सांधेरोपण शस्त्रक्रिया, फिशर, भगंदर, गर्भाशय शस्त्रक्रिया, चरबीच्या गाठी, पित्ताशय शस्त्रक्रिया होणार आहेत. मोफत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, कान, नाक व घसा, मूत्ररोग, अस्थिरोगचा समावेश आहे. यासाठी पहिल्यांदा तपासणी व नोंदणी होणार आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे पहिल्यांदा तपासणी व नोंदणी करावी लागणार आहे.

या अभियान अंतर्गत एक हजार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.पात्र रुग्णांना शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ने – आण करण्यासाठी वाहतूक सुविधा आहे. शस्त्रक्रिया अभियान दरम्यान रुग्ण व नातेवाईकांच्या आहाराची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केली आहे. शस्त्रक्रियेसाठी पाच रुग्णालये निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसंबंधी रुग्णांना माहिती दिली जाणार आहे. कसबा बावडा  येथील सेवा रुग्णालय, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, उपजिल्हा रुग्णालय गारगोटी, ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. असे माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. सरिता थोरात, डॉ. एम.डी. देशमुख, डॉ. आशा कुडचे, डॉ. फारुख देसाई, तेजस पारकोलकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes