Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

जिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठक

schedule19 Aug 26 person by visibility 435 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने ज्या योजना सुरू आहेत त्या लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात तसेच या योजना कार्यान्वित करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी  केली.
     जिल्हाधिकारी कार्यालयात आज जल जीवन मिशन,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन, जिल्हा प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी  माधुरी परीट, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे प्रामुख्याने उपस्थित होते.  जिल्हाधिकारी म्हणाले, मूळ आराखडयानुसार पाणीपुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या स्थानांतरित कराव्यात तसेच सरकारी स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यानंतर ४६ गावच्या ज्या योजना कार्यान्वित कराव्यात. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्यात सध्या किती योजना सुरू आहेत ? त्याचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे ? तसेच त्याची सद्यस्थिती काय ? याबाबत विचारणा करून पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने  आवश्यक त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.   जॅसमिन म्हणाल्या, या विभागाद्वारे ज्या योजना पूर्ण आहेत त्या योजना स्थानातंरित  करा म्हणजे रिवाईज करण्याचा प्रश्नच येणार नाही तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी घन कचऱ्याबाबत जिल्ह्यात 5 कामे अपूर्ण आहेत. दोन कामे नव्याने सामिल करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली.   या बैठकीत पी.ए कराड,पी के आलटकर, सचिन देशमुख, तुषार चौगुले, हेमंतकुमार मदवाने, डी एस पाटील उपस्थित

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes