Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

महापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्ष

schedule19 Aug 26 person by visibility 483 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महापालिकेच्या बुधवारी 19 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका नेहा अभय तेंडुलकर यांनी महापालिका शाळांच्या पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, त्यांना पुरवण्यात येणाऱ्या मुबलक सोयी सुविधा याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ' एखादी शाळा बंद होते, तेव्हा केवळ इमारत बंद पडत नाही तर गरीब मुलांच्या स्वप्नांना फुलस्टॉप लागतो' अशा शब्दात नगरसेविका तेंडुलकर यांनी शाळांच्या सुविधाकडे लक्ष वेधले. महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आयुक्त राजेंद्रकुमार भारुड यांची प्रमुख उपस्थिती होती उपायुक्त किरण कुमार धनवडे यांनी महापालिका शाळेतील पायाभूत सुविधा इमारत दुरुस्ती व विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असल्याचे सभागृहाला सांगितले.
 नगरसेविका नेहा तेंडुलकर यांनी महापालिकेच्या एकूण शाळांची स्थिती विविध शाळेमध्ये करावयाच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता यावर सभागृहाचे लक्ष वेधताना विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी  साऱ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती या पन्नास वर्षांपूर्वीचे आहेत काही इमारतीला गळती लागले हे काही ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मैदानाची दुरवस्था झाली आहे. गोरगरिबांची मुले या शाळेत शिकतात. राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली होती या साऱ्याचे स्मरण ठेवून महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या मालकीच्या शाळांमध्ये विद्यार्थी केंद्रभूत सुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. महापालिका शाळेमध्ये चांगल्या दर्जाच्या स्वच्छतागृहांची गरज आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी सोय केली पाहिजे. खाजगी शाळेची स्पर्धा करताना महापरीक्षा शाळेतील विद्यार्थी संख्येत घट होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत अशी सूचना ही त्यांनी केली.
 त्यांच्या या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना उपयुक्त किरणकुमार धनवडे म्हणाले, ' महापालिकेच्या मालकीची एकूण 55 शाळा सुरू आहेत. महापालिका शाळेतील गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होताना दिसत आहे. महापालिका शाळांच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी इमारत दुरुस्तीसाठी व विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. या निधीच्या माध्यमातून महापालिका शाळांच्या पायाभूत सुविधा वरती फोकस राहणार आहे.' आयुक्त भारूड यांनीही महापालिका शाळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती मधून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.' असे सभागृहाला सांगितले.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes