Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !

schedule19 Aug 26 person by visibility 164 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लब'च्यावतीने दरवर्षी १९ ऑगस्ट हा 'जागतिक फोटोग्राफी दिन'   विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील दिवंगत ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार यंद ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांना जाहीर झाला आहे. तसेच वर्षीपासून  दिवंगत प्रेस फोटोग्राफर संजय देसाई यांच्या स्मरणार्थ सुरू केलेला ,' संजय देसाई स्मृती 'विशेष दृष्टी पुरस्कार "प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात येणार आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे बुधवारी, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी पद्मश्री सुधारक ओलवे हे उपस्थित राहणार आहेतया कार्यक्रमात सुधारक यांच्या आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांचा 'स्लाईड शो', 'प्रेस फोटोग्राफी' 'फोटोग्राफरने जपावयाचे सामाजिक भान' या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळचे  चेअरमन ललित गांधी  हे उपस्थित राहणार आहेत

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes