कोल्हापुरात रविवारी गुरुवंदना महोत्सव
schedule22 May 24 person by visibility 414 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर: विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड संचलित आणि नादब्रह्म संगीत गुरुकुल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २६ मे रोजी गुरुवंदना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शास्त्रीय वादनातील अनेक कलाकार आपली सेवा बजावणार आहेत.
पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात रविवारी सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नादब्रह्म संगीत गुरुकुलाचे संस्थापक अमोल राबाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात सांगलीचे शफात नदाफ यांचे सतार वादन आणि कोल्हापूरचे अमोल राबाडे यांचे बासरी वादन एकत्रित सादर करणार आहेत. गोव्याचे सोनिक वेलिंगकर एकल बासरी वादन करणार असून त्यांना वारणानगरच्या प्रसाद लोहार यांची तबल्यावर साथ मिळणार आहे.
कोल्हापूरच्या संगीत जगतात अनेक वर्ष तपस्वी वृत्तीने सेवा करणाऱ्या वादकांचा सत्कार करण्यात येणार आहे . ९४ वर्षीय जेष्ठ हार्मोनियम वादक रघुनाथ सबनीस आणि ८४ वर्षीय द्वारकानाथ पै, लेखिका अनुवादीका सोनाली नवांगुळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी माऊली महाराज व गुरुनाथ महाराज, बासरी वादक कृष्णात लोटेकर, महेश पाटील, संतोष अंगापूरकर, केसरकर महाराज, शिवाजी राबाडे, विश्वास सुतार उपस्थित राहणार आहेत. वैदेही जोशी सूत्रसंचालन करणार आहे.