+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Sep 22 person by visibility 535 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारने विविध मागण्यांची पूर्तता करावी यासाठी ग्रामसेवकांनी, सोमवारी(ता.१२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेउन १९ मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा कोल्हापूर निवेदन दिले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात बाबासाहेब कापसे, के. टी. सिताप, राजेंद्र भोपळे, आनंदा तळेकर, राहूल सिदनाळे, सुजाता कांबळे, लता कणसे, सागर खोत, प्रवीण पोवार, सुधाकर रेळेकर, विष्णू गावडे, सम्राट रानगे, उमा पाटील, टी. जे. अत्तार, दिपक पाटील, आर.डी.कुंभार, शिवाजी वाडकर, बी. के. कांबळे यांच्या नावानिशी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
 ‘ग्रामसेवकांमधून ग्रामविकास अधिकारीपदी रखडलेली पदोन्नती तत्काळ द्यावी, निलंबन कालावधी सेवेत कायम धरण्यात यावा, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना कायम द्यावेत, वैद्यकीय बिले बजेटसह त्वरित मिळावेत, ग्रामविकास विभाग सोडून इतर कामे लावू नयेत.’ आदी मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
……………………………