Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटप

schedule28 Jun 25 person by visibility 565 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जाणीवेने उपक्रम राबवण्यात आला. सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर, पाच हजार बॅगटोपी आणि दिनदर्शिका या साहित्याचे मोफत वाटप केले.

गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी  मुश्रीफ यांनी ‘पालखी सोहळा हा आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे यामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक वारकरी म्हणून सहभागी असतातत्यामुळे या उपक्रमातून  त्यांच्यापर्यंत गोकुळची साथ पोहोचवणेहे संघाचे सामाजिक कर्तव्य समजूनच हा उपक्रम राबवला जात आहे.’असे नमूद केले.

 यावेळी बिद्री साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन मनोज फराकटे, रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील, माधव पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील, मयूर आवळेकर, निलेश शिंदे, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, मार्केटिंग विभागाचे सुनिल गायकवाड, मानसिंग चौगले उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes