कृष्णराज महाडिकांची महापालिका निवडणुकीतून माघार
schedule28 Dec 25 person by visibility 197 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका निवडणुकीतून महागाई घेतली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षपातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाही असा खुलासा , कृष्णराज महाडिक यांनी केला आहे महाडिक यांनी शनिवारी 27 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता
कृष्णराज महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे, भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.