जनावरांच्या आरोग्यासाठी गोकुळ सरसावले, गोचिड निर्मूलन-थायलेरिया लसीकरण मोहिम
schedule28 Feb 24 person by visibility 256 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मूलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहिम सुरू केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होतेे. चेअरमन डोेंगळे म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये सध्या थायलेरीया (गोचिड ताप) हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे, या आजाराचा प्रसार गोठ्यातील गोचिडामुळे होतो परिणामी अशी जनावरे कायम स्वरूपी निकामी होतात अथवा त्यांच्या दूध उत्पादन व प्रजनन शक्तीवर मोठा परिणाम होत असल्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोकुळने गोचिड निर्मूलन व थायलेरीया लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम जिल्ह्यातील गोकुळ संलग्न सर्व गावामध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोचिड निर्मूलन व थायलेरीया लसीकरणाचे व औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी लालबहादूर दूध संस्थेचे चेअरमन वाय.सी.खोत, यशोधा महिला दूध संस्थेच्या चेअरमन सौ.मनिषा पताडे, भावेश्वरी दूध संस्था चेअरमन भास्कर खोत, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, राजू खोत, शिवाजी डोंगळे, संदीप ढेकळे, एल.के.खोत,अशोक खोत, द.ग.पताडे, युवराज सुतार,आर.डी.खोत, यशवंत खोत. शोभा खोत तउपस्थित होते.
-