
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा व शहर युवासेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत प्रथमोपचाराविषयी प्रशिक्षण द्या, तसेच विद्यार्थिनीसाठी प्रत्येक शाळेमध्ये सॅनिटरी पॅड व किट्स असावेत,अशी मागणी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे केली. युवा सेनेचे पदाधिकारी मंजित किरण माने, वैभव जाधव, शेखर बारटक्के, अजय वाडकर, कीर्तीकुमार जाधव, निलेश सूर्यवंशी, प्रथमेश देशिंगे, सार्थक कोळेकर, विशाल गायकवाड,चैतन्य देशपांडे,मंगेश चीतारे,ऋषिकेश गायकवाड,सुधीर चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने ही मागणी केली.