शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले लवकर द्या, युवा सेनेची मागणी
schedule21 Jun 24 person by visibility 129 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध शासकीय दाखल्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी शिवसेना-युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे केली. यंदाचे शैक्षणिक वर्ष जून जुलैमध्ये सुरू झाले आहे. शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या जातीचे दाखले ,नॉन क्रिमिलियर दाखला ,रहिवासी दाखला ,उत्पन्न दाखला या दाखल्यांचे वितरण संथ गतीने चालू असल्याच्या तक्रारी युवा सेनेकडे पालकांनी केल्या आहेत. विद्यार्थी व पालकांचा होणारा मनःस्ताप पाहता,
सदरचे दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची सूचना आपल्या मार्फत संबंधित विभागांना द्यावी. त्याच प्रमाणे संबंधित दाखल्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी शिवसेना-युवासेना यांचा वतीने निवासी उप जिल्हाधिकारी तेली यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी दाखले देण्यासंदर्भात शिबिरे लवकरात लवकर घेतली जातील असे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने, शहर अधिकारी योगेंद्र माने , संतोष कांदेकर, शहर समन्वयक बंडा लोंढे, माधुरी दळवी, कुणाल आदमाने, बॉबी फर्नांडिस, गणेश लोहार,विराज जांभळे आदी उपस्थित होते.