गावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे : घोडावत विद्यापीठाचा 'अर्थ प्रबोधन' कार्यक्रम
schedule28 Mar 23 person by visibility 182 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :संजय घोडावत विद्यापीठातील एम.बी.ए द्वितीय वर्ष फायनान्सच्या विद्यार्थ्यांनी अर्थ प्रबोधन कार्यक्रमांतर्गत आळते येथील गावकऱ्यांना अर्थकारणाचे धडे दिले.यावेळी सरपंच अजिंक्य इंगवले,डॉ.रेवती देशपांडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आर्थिक नियोजन म्हणजे काय? ते कसे करतात? का आणि कशासाठी करतात? त्याचे फायदे काय? या विषयाची माहिती दिली त्याचबरोबर लघु नाटिकेच्या सादरीकरणाद्वारे शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली.यासाठी एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी संवाद मोहीम राबवली.अशा प्रकारच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळते. तसेच पुस्तकी ज्ञानाचे परिवर्तन प्रात्यक्षिक शिक्षणातून केल्यामुळे वास्तविक कार्पोरेट जगामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी करण्यास मदत होते. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यासाठी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.