Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !

schedule14 Sep 26 person by visibility 71 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत दोन दशकाहून अधिक काळापासून गणरायाची प्रतिष्ठापना होते. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पुढाकार असतो. यंदा, एका सामाजिक संघटनेने सरकारी कार्यालयात उत्सव साजरा करता येत नाहीत अशी तक्रार केली. त्यानुसार प्रशासनाने, यंदा जिल्हा परिषदेत गणेश उत्सव करण्यास मनाई केली. दरम्यान गणेश उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी एकवटले. त्यांनी, उत्सव साजरा करण्याचे ठरविले. साऱ्यांनी एकत्र येत गणेश चतुर्थीला जिल्हा परिषदेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणरायाच्या पूजनाला मंत्री हसन मुश्रीफ आले. गेले महिनाभर जिल्हा परिषदेत गणेश उत्सवावरुन सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला आणि इमारतीत गणरायाचा गजर घुमला.

जिल्हा परिषद कर्मचारी कलामंचतर्फे, मुख्यालयात गणेश उत्सव साजरा होतो. त्याला दोन दशकाची परंपरा आहे.यंदा, संविधान प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने सरकारी कार्यालयात उत्सव साजरा करता येत नाहीत अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्याकडे केली. त्या संघटनेने नियमावली सादर करत सरकारी कार्यालयात उत्सव साजरा करण्यावर आक्षेप घेतला. प्रशासनाने, उत्सव साजरा करण्यास मनाई केली. प्रशासन जो निर्णय देईल तो मान्य राहील असे कर्मचाऱ्यांनी जाहीर केले. दरम्यान मुख्यालयातील उत्सव साजरा करण्यास तक्रारी व मर्यादा आणल्याचे जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांना समजले. सदस्य व पदाधिकारी एकवटले. साऱ्यांनी मिळून गणेश उत्सव साजरा करायचा, गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. राज्य सरकारने गणेश उत्सव हा राज्य उत्सव जाहीर केला आहे, मग त्यावर मर्यादा कशासाठी अशी भूमिका सदस्य व पदाधिकाऱ्यांनी घेतली. विषय मंत्र्यांच्यापर्यंत पोहोचला.

सोमवारी, (१४ सप्टेंबर २०२६) गणेश चतुर्थी. यादिनी गणरायाची विधीवत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, सुधीर देसाई, क्रांतििंह पवार पाटील, सागर धुंदरे, शिवाजी जाधव, इंद्रजीत पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, शिवाजी जाधव, अतिश शिंगे, दिलीप पाटील, शशिकांत खोत, प्रविण यादव, अविनाश गायकवाड, विलास पाटील,  यांच्यासह जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान मंत्री मुश्रीफ यांचे जिल्हा परिषदेत आगमन झाल्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांनी स्वागत केले.

..............

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes