Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव मानेयकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले बरे पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडेशहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी

जाहिरात

 

अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !

schedule13 Sep 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील भौतिक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जिल्ह्यात शाळा भेटी धडाका सुरू केल्या आहेत. क्षीरसागर यांनी गगनबावडा तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंधे आणि अणदूर या दोन शाळांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.या प्रत्येक शाळेत तीन तासांच्या भेटीदरम्यान त्यांनी तपासणी केली.

पायाभूत सुविधातंर्गत वर्गांची भौतिक स्थिती, छताची दुरुस्ती, वीज जोडणी, बेंच व फर्निचरची उपलब्धतेची पाहणी केली. तसेच मुले व मुलींसाठी स्वतंत्र कार्यन्वित स्वच्छतागृहांची सुविधा, पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि टाकीची स्वच्छता,  विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा, किचन शेडची स्वच्छता, अन्नधान्य साठवणूक आणि दैनंदिन ऑनलाईन उपस्थिती नोंदणी, विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, मूलभूत गणितीय संख्याज्ञान कौशल्य (FLN), निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी आणि डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची सद्यस्थिती पाहिली. शाळा भेटींनंतर त्यांनी गगनबावडा पंचायत समितीला भेट देऊन तेथील शिक्षण विभागाच्या प्रशासकीय व सक्षमीकरण शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी न्यू राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला भेट दिली.

शाळा भेटींच्या सत्रानंतर नोडल अधिकारी क्षीरसागर यांनी जिल्हास्तरावर तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, प्राथमिक शिक्षण अधिकारी अशोक घुगे, माध्यमिक व योजना विभागाचे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित होते. बैठकीत त्यांनी, अचानक भेटींचा इशारा:अभियानाच्या कालावधीत (२० ऑक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळेला कधीही पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली जाईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes