आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादन
schedule14 Sep 26 person by visibility 36 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात मंगळवार १५ सप्टेंबर २०२६ पासून होत आहे. दरम्यान; अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी करवीर तालुक्यातील चुये येथील गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला अभिवादन केले. समाधीला पुष्पहार अर्पण केले.यावेळी माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, अजित नरके, युवराज पाटील, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगुले, डॉ. सुजित मेणचेकर, करणसिंह गायकवाड, एस.आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, अशोक फराकटे उपस्थित होते.