Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनयिमतता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव मानेयकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले बरे पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडेशहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडीटीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभविधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथमयुवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमण

जाहिरात

 

उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनयिमतता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

schedule13 Sep 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :उजळाईवाडी ग्रामपंचायतीमधील वाढता भ्रष्टाचार, कामकाजातील अनियमितता आणि सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात प्रशासनाने तत्काळ पावले न उचलल्यास करवीर पंचायत समितीसमोर उपोषण करू. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांवर योग्य कारवाई न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य राजीव माने यांनी दिला.

माने यांनी शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी उजळाईवाडी येथे नागरिकांसह काही ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.  कोल्हापूर शहरालगत असलेल्या उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे दिवसेंदिवस महत्व वाढत आहे. नागरिकीकरणाचा वाढता वेग, वाढती लोकसंख्या आणि बदलते सामाजिक-आर्थिक स्वरूप यामुळे उजळाईवाडी ग्रामपंचायतीसमोरही प्रशासन आणि विकासाच्या दृष्टीने अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख व्हावा, तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अधिकारांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी माने  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उजळाईवाडी येथे बैठक घेऊन लढयासाठी नागरिकांना संघटित केले. याप्रसंगी ते बोलत होते.

ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात काही बांधकामे अथवा परवानग्यांबाबत नियमांचे पालन झाले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच विविध विकासकामांसाठी उपलब्ध निधी खर्च करताना नियम व प्रक्रियेचे पालन व्हावे, निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाले किंवा ग्रामपंचायत व्यवस्था कायम राहिली, तरी नागरिकांचा स्थानिक प्रशासनातील सहभाग, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे महत्त्वाचेच राहणार आहे. त्यामुळे सध्याच्या ग्रामपंचायत व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याबरोबरच नागरिकांना आपल्या लोकशाही अधिकारांची जाणीव करून देणे, हा या आंदोलनाचा व्यापक पैलू ठरतो.

ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांचा प्रभावी सहभाग आणि अंकुश असावा अशी मते उमटली.ग्रामपंचायत अधिक सक्षम व्हावी, ग्रामसभा अधिक प्रभावी व्हावी आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या गावाच्या विकास प्रक्रियेत आपला हक्काचा सहभाग मिळावा, हीच या लोकलढ्याची व्यापक दिशा असल्याचे दिसून येत आहे.याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणिमा सुनिल माने, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पंडित, विलास कुंभार, पोपट नाईक, विनायक बागणे , अशोक लांडगे,  माधुरी आदित्य दळवी,  प्रतिभा संदीप पोवार, सारिका अभिजीत माने,  बंटी साळुंखे आदी उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes