Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्या

जाहिरात

 

भागीरथी संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेत महिलांची धमाल ! कलाकारांची हजेरी !!

schedule16 Sep 25 person by visibility 520 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया बक्षिसाची स्पर्धा अशी ओळख असलेल्या भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धा प्रचंड उत्साहात पार पडली. या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत सुमारे दहा हजार महिलांनी सहभाग घेवून, पारंपारिक लोककला आणि खेळांचे प्रदर्शन घडवले. नटूनथटून आलेल्या पारंपारिक वेशातील महिलांचा उत्साह, जल्लोष आणि चैतन्य यामुळे यावर्षीची स्पर्धासुध्दा अविस्मरणीय ठरली. दरम्यान अनेक कलाकारांनी या स्पर्धेला उपस्थिती लावत सहभागी महिलांना प्रोत्साहानाची दाद दिली.
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित, भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने खासदार महोत्सवार्ंगत झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धनंजय महाडिक युवाशक्तीचे चंदगड येथील प्रमुख मायाप्पा पाटील हे तालुक्यातील सुमारे ७०० महिलांना घेवून, वाजत गाजत स्पर्धा स्थळी आले.  अकरा वाजण्याच्या सुमारास स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. श्रीमती मंगलताई महाडिक, श्रीमती शकुंतला महाडिक, मंगल महादेवराव महाडिक, श्रीमती साधना शंकरराव महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक,  वैष्णवी पृथ्वीराज महाडिक,  अंजली विश्‍वराज महाडिक, डॉ. प्रिया दंडगे, माधुरी नकाते आणि हॅलो कदम चित्रपटातील अभिनेत्री श्‍वेता कामत यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरवात झाली.

यावेळी अरूंधती महाडिक यांच्यासह मान्यवर महिलांनी, मंचावरच सुप नाचवणे, घागर घुमवणे आणि फुगडी घालून उद्घाटनाच्या सोहळयात जोश निर्माण केला. तर मंगल महाडिक यांनी घेतलेल्या उखाण्याला महिलांनी टाळयांच्या गर्दीत दाद दिली. अभिनेत्री सुरेखा कुडची, शाश्‍वती, प्राजक्ता परब, रसिका वखारकर,  कांची शिंदे, क्षमा देशपांडे यांनीही झिम्मा फुगडीच्या स्पर्धेला उपस्थिती लावत धमाल  केली. काही कलाकारांनी थेट झिम्मा फुगडीचा फेर घालत स्पर्धेत रंग भरला. स्पर्धेदरम्यान खासदार धनंजय महाडिक, भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्‍वराज महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी उपस्थिती लावत स्पधर्कांचा उत्साह वाढवला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes