स्टायलिश अन् आरामदायी दि ऑल न्यू व्हेन्यू माई ह्युंदाईमध्ये
schedule08 Nov 25 person by visibility 73 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ह्युंदाई मोटर इंडियाने थर्ड जनरेशन कॉम्पॅक्ट एसयूव्ह अर्थात नवीन व्हेन्यू कार अलीकडेच ग्राहकांसाठी उपलब्ध क केली. माय ह्युंदाई शोरूममध्ये शनिवारी, आठ नोव्हेंबर रोजी या कारचं अनावरण दिमाखात झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीसप्रमुख योगेश कुमार यांच्या हस्ते नवीन व्हेन्यू कारचा अनावरण सोहळा झाला.
ह्युंदाईने ही नवीन व्हेन्यू बाजारात आणताना डिझाइन, फीचर्स आणि परफॉर्मन्सवर विशेष भर दिला आहे. या कारला नवीन फ्रंट आणि रियर बंपर्स, मॉडर्न एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल्स, टेललाइट्स आणि पूर्णतः नवीन ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय १७ इंची ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि सी शेप्ड डीआरएल्स यामुळे ही कार आता अधिक स्टायलिश आणि आक्रमक दिसते. आतल्या बाजूला प्रीमियम इंटिरियर, ऍडव्हान्स्ड इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सेफ्टी फीचर्ससह ग्राहकांना आरामदायक प्रवासाची हमी दिली आहे. यापुर्वीचा व्हेन्यूचा परफॉर्मन्स आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेता नवीन व्हेन्यूला आधीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आजअखेर १०० हून अधिक ग्राहकांनी नवीन व्हेन्यूसाठी नोंदणी केली आहेत. नवीन व्हेन्यूमधील फीचर्स आणि किंमतीबाबत बिझनेस हेड निखिल शिंदे यांनी उपस्थितांना माहिती दिली.
नवीन व्हेन्यू नवीन फिचर्सनी परिपूर्ण एसयूव्ही ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. ही कार शहरातील ट्रॅफिकपासून ते लांबच्या प्रवासापर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि आरामदायी आहे. ग्राहकांनी या कारच्या टेस्ट ड्राइव्ह आणि बुकींगसाठी माई ह्युंदाईच्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या जवळच्या शोरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं आहे.यावेळी माई ह्युंदाईचे डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, सेल्स हेड सुनिल खांडेकर व अभिजीत यादव तसेच मान्यवर ग्राहक, घाटगे ग्रुपमधील कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.