Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्रीकोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीएनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरलासीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदली

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या चेअरमन पदी साताप्पा कासार, व्हाइस चेअरमनपदी अमित परीट

schedule08 Nov 25 person by visibility 173 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी  साताप्पा कासार व व्हाईस चेअरमनपदी अमित परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सहकार खात्याचे श्रेणी १ चे अध्यासी अधिकारी  एम. ए. मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. 
संस्थापक  भरत रसाळे यांनी  मनोगत व्यक्त करताना  संस्थेचा कारभार नेहमीच पारदर्शी, काटकसरी व सर्वसामान्य सभासदाभिमुख ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.  नूतन चेअरमन  कासार व व्हाईस चेअरमन  परिट यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
 चेअरमन  साताप्पा कासार यांनी मनोगतात  संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा माझा प्रयत्न असेल. परिट यांनी  पतसंस्थेच्या लौकिकास साजेसा कारभार आम्ही करू असे नमूद केले.
यावेळी सहकारी अधिकारी इंगवले  माजी चेअरमन मच्छिंद्र नाळे,  महादेव डावरे, सूर्यकांत बरगे, सर्जेराव नाईक, शिवाजी सोनाळकर, संतोष आयरे, रोहिणी यडगे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes