शाश्वत विकासाची दिशा स्वीकारली, तर देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवू - विनायक पई
schedule07 Nov 25 person by visibility 23 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “विकसित भारत” हा दूरदृष्टीचा संकल्प आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी तरुणांचा सहभाग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा, एमएसएमई प्रोत्साहन हा महत्त्वाचा घटक ठरेल. आपल्याला भविष्यातील विकासासाठी शाश्वततेकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. जर आपण आज शाश्वत विकासाची दिशा स्वीकारली, तर आपण या महान देशासाठी एक उज्ज्वल भविष्य घडवू.’असे मत सीआयआय महाराष्ट्र स्टेट कौन्सिल चे चेअरमन विनायक पई यांनी व्यक्त केले.
कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सीआयआय - साउथ महाराष्ट्र झोन यांच्यावतीने “ सीआयआय इंडिया @ १०० : दि विकसित भारत ड्रीम” या विषयावर औद्योगिक परिषद हॉटेल पॅव्हिलियन येथे झाली. सीआयआय साउथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे चेअरमन सरंग जाधव यांनी 'जागतिक आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करणे' ही आहे असे सांगितले. वॅबटेक इंडिया इंडस्ट्रियलचे वरिष्ठ संचालक विजय इनामके यांनी लोको आणि मेट्रो क्षेत्रात पुरवठादारांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रे सर्टिफिकेशन आणि गुणवत्ता निकषांचे पालन अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पहिल्या सत्रात “ जागतिक स्पर्धा - स्थानिक विकास : विकसित भारतासाठी एमएसएमई वाढ ” या विषयावरील चर्चासत्रात समन्वयन एस. बी. रिसेलर्स व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर, पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्सचे सुधीर मुतालिक, ग्रीव्ह्स कॉटनचे प्रशांत नारवडे ,संजय ग्रुपचे प्रसाद कोकिळ आणि मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या अश्विनी दाणीगोंड यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या चर्चासत्रात “ भविष्यासाठी तयारी : तंत्रज्ञानाधारित आणि लोककेंद्रित उद्योगनिर्मिती ” या विषयावर चर्चा झाली. या सत्राचे संयोजन एक्स्पर्ट ग्लोबल ग्रुप चे संचालक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. पॅनेलिस्ट म्हणून एंड्रेस अँड हॉउजरचे नरेंद्र कुलकर्णी, ब्रोझ इंडिया ऑटोमोटिव्ह चे राजेश कुलकर्णी, ॲक्सेंचर टेक्नॉलॉजीजचे श्रीकांत सारडा आणि बी. जी. चितळे डेअरीचे गिरीश चितळे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वीरेंद्र जाधव यांनी केले. समारोप सत्रात सीआयआय साउथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योगांनी तंत्रज्ञान, नावीन्य आणि कौशल्य विकास यांचा संगम साधणे अत्यावश्यक आहे.’असे नमूद केले. कार्यक्रमास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, स्मॅकचे व्हाईस चेअरमन भरत जाधव, मॅकचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, आयआयएफचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष सतीश कडुकर, उद्योजक मंगेश पाटील, चंदू राठोड, प्रताप पुराणिक, संजय भगत, श्रावणी मेनन, आदित्य बेडेकर आदी उपस्थित होते.