मूक मोर्चातून उमटला शिक्षकांचा हुंकार ! टीईटी अनिवार्यच्या विरोधात हजारो जण रस्त्यावर !!
schedule08 Nov 25 person by visibility 1583 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ना कसल्या घोषणा, ना स्पीकरबाजी, ना सभामंडपावरुन नेत्यांची भाषण…तरीही कोल्हापुरात शनिवारी टीईटी अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात काढलेल्या मूक मोर्चातून शिक्षकांचा हुंकार उमटला. सुप्रीम कोर्टाने सरसकट टीईटी लागू करण्यासंबंधी जो निर्णय दिला आहे, त्या विरोधात राज्य सरकारने तत्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढलेल्या या मोर्चाने शिक्षकांची एकी दाखवून दिली. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. राज्य सरकारने लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर 24 नोव्हेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सुप्रीम कोर्टाने एक सप्टेंबर २०२५ रोजी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सगळयाच शिक्षकांना टीईटी अनिवार्य केली आहे. दोन वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करणे म्हणजे अन्यायाचा शिखर असल्याची भावना शिक्षक वर्गात आहे. पंचवीस-तीस वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पुन्हा टीईटीची सक्ती कशासाठी ? असा त्यांचा सवाल आहे. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी म्हणून शिक्षक संघटनांनी शनिवारी, (आठ नोव्हेंबर २०२५) कोल्हापुरात मूक मोर्चा काढला होता. आमदार जयंत आसगावकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी.लाड, शिक्षक नेते राजाराम वरुटे, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड, प्रसाद पाटील, बाबा पाटील , सुधाकर सावंत आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. आंदोलनात प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, दत्तात्रय घुगरे, संभाजी बापट , मुख्याध्यापक संघाचे राहुल पोवार, प्रमोद तौंदकर, एस के पाटील, शिक्षक बँकेचे संचालक जी.टी. वर्धन, गजानन कांबळे, माजी अध्यक्ष राजमोहन पाटील , बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, जी एस पाटील, बजरंग लगारे, शिवाजी पाटील, बबन केकरे, बी एस पाटील, सर्जेराव सुतार, मारुती दिंडे, श्रीकांत चव्हाण, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, उमेश देसाई, श्वेता खांडेकर, शारदा वाडकर, अनिता ठाणेकर, ज्योत्स्ना महात्मे, वर्षा सनगर, नूरजहाँ मुलाणी, अनिता तिटवे, मुख्याध्यापक संजय सौंदलगे, विजय भोगम , सविता पाटील, संध्या कुलकर्णी, बाळ डेळेकर, महादेव डावरे, विलास पिंगळे, शिवाजी भोसले, विजय सुतार, दिलीप माने, माजी मुख्याध्यापक आर डी पाटील, शिवाजी माळकर, अनिल चव्हाण, उदय पाटील, मनोजकुमार रणदिवे, नामदेव पाटील, किरण माळी, गजानन काटकर, प्रकाश पाटील, संदीप पाटील, अमित पोटकुले यांच्यासह शिक्षक व महिला शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला
मोर्चा मूक, फलक ठरले लक्षवेधी
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मूक मोर्चा असल्यामुळे कोणत्याही स्वरुपाच्या घोषणा नव्हत्या. मात्र शिक्षकांच्या हातातील फलफ लक्षवेधी ठरले. ‘शिक्षक एकजुटीचा विजय असो, टीईटी रद्दबाबत सुप्रीम याचिका दाखल करा, शिक्षण सेवक पद - रद्द करा, वस्तीशाळा शिक्षकांची - मूळ सेवा ग्राह्य धरा, १५ मार्च संचमान्यता जी आर - रद्द करा, शंभर टक्के विषय शिक्षकांना - पदवीधर वेतनश्रेणी द्या. सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांना न्याय द्या – अन्यायकारक टीईटी रद्द करा ! टीईटी नव्हे तर शिक्षकांचा अनुभव मोठा आहे, शिक्षणाची सेवा हीच आमची ओळख, ज्यांनी घडवले भविष्य, त्यांनाच आज परीक्षा ?, शिक्षकांचा अपमान - नाही सहन करणार, आमचा अनुभवच…हीच आमची पात्रता, शिक्षकांचा संघर्ष – शिक्षणाचा अभिमान, शिक्षकांना सन्मान द्या, शिक्षकांची परीक्षा संपली – आता सरकारची सुरू झाली, आमचं काम बोलतं –टीईटी नको, सन्मान हवा, प्रसंगी आरटीई कायद्यात- दुरुस्ती करा.’ही घोषवाक्ये साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
………………………………………………..
मोर्चात ३७ शिक्षक संघटनांचा सहभाग, राज्य सरकारी कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा
आंदोलनात सहभागी संघटना –महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ( माजी आमदार शिवाजीराव पाटील गट), महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ , शिक्षक परिषद (प्राथमिक) , शिक्षक परिषद (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक सेना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शिक्षक भारती, आदर्श शिक्षक समिती, न. पा. व म. न. पा. शिक्षक संघ, बहुजन शिक्षक महासंघ, प्रहार शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र जि.प.मागासवर्गीय शिक्षक संघटना , 'आस' शिक्षक संघटना, स्वराज्य शिक्षक संघटना, सहकार शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक महासंघ, इब्टा शिक्षक संघटना, एकल शिक्षक सेवा मंच, आदिवासी शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ (प्रोटान), मुंबई शहर आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी, मागासवर्गीय शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघ (खाजगी ), वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट् राज्य, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक उर्दू शिक्षक संघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच मोर्चा सहभाग नोंदवला कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, संजय क्षीरसागर, विठ्ठल वेलणकर, नंदकुमार इंगवले, राजदीप मोडक आदींचा सहभाग होता.