Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पेट सीटी स्कॅनची उपलब्धता, पालकमंत्र्यांच्या हस्ते मशीनचे उद्घाटनमूक मोर्चातून उमटला शिक्षकांचा हुंकार ! टीईटी अनिवार्यच्या विरोधात हजारो जण रस्त्यावर !!खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या चेअरमन पदी साताप्पा कासार, व्हाइस चेअरमनपदी अमित परीटमुलींची प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाचे प्रगती : मंत्री चंद्रकांत पाटीलटीईटी रद्द करण्यासंबंधी शिक्षक संघ थोरात गटातर्फे सुप्रीम कोर्टात याचिकासंजय घोडावत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला माजी राष्ट्रपती प्रमुख पाहुणेशाश्वत विकासाची दिशा स्वीकारली, तर देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवू - विनायक पईडीवाय पाटील कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पासक्षम उमेदवारलाच उमेदवारी, महाविकास आघाडी म्हणून लढायचं -अजिंक्यतारा कार्यालयात नेत्यांची बैठकगोकुळची गोबरसे समृद्धी बायोगॅस योजना गतिमान, पाच हजार बायोगॅस मंजूर –नविद मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पेट सीटी स्कॅनची उपलब्धता, पालकमंत्र्यांच्या हस्ते मशीनचे उद्घाटन

schedule08 Nov 25 person by visibility 27 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  पेट सीटी स्कॅन मशीनची उपलब्धतता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल, असे मत आरोग्यमंत्री  व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. 
कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे  आबिटकर यांच्या हस्ते पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कॅन्सरविरुद्धच्या लढाईत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे अशी चांगली सुविधा उपलब्ध करीत आहात. त्याबद्दल डॉ. सूरज पवार यांच्यासह त्यांची पूर्ण टीम कौतुकास पात्र आहे. पेट सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून कोल्हापूर कॅन्सर सेंटरने कॅन्सरविरुद्धच्या लढाईत आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे. डॉ. सूरज पवार यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे उपलब्ध असणाऱ्या सुविधांविषयी अधिक माहिती देऊन ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर कर्नाटक, गोवा येथील कॅन्सर रुग्णांसाठी पेट सीटी स्कॅन मशीन वरदान ठरेल. यामुळे त्वरित निदान होऊन रुग्णावर अचूक उपचार करणे सोपे जाईल.  
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, रुग्णांना उपचारासाठी आता पुणे-मुंबई येथे न जाता येथेच जागतिक स्तरावरील सुविधा त्यांना उपलब्ध तर होत आहेच शिवाय नेहमीच रुग्णांसाठी आधुनिक सुविधांचा ध्यास कोल्हापूर कॅन्सर सेंटरने घेतला आहे. डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले.यावेळी डॉ. रेश्मा पवार, डॉ. शरद टोपकर, डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे  आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes