यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले बरे
schedule13 Sep 26 person by visibility 4 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद आणि अपोलो हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सेवा-उपचार यामुळे यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत बरे झाले. वैद्यकीय क्षेत्रातील ही यशोगाथा विशेष कौतुकाची ठरली आहे. पद्मजा नांद्रे या कोल्हापूरहून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी दाखल झाल्या होत्या. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावत होती. प्रत्यारोपणाची आवश्यकता भासल्यास त्यांच्या मुलीची, संभाव्य जिवंत यकृतदाता म्हणून तपासणी करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेची वेळ जवळ आलेली असताना त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये झालेल्या सकारात्मक बदलामुळे डॉक्टरांनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर रुग्णांच्या तब्बेतील लक्षणीय सुधारणा होत गेली. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र अपोलो हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे बारकाईने लक्ष, तत्पर आणि अत्याधुनिक उपचार यामुळे रुग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिय करण्याची वेळच आली नाही. यासंदर्भातील माहिती डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. गुरुप्रसाद शेट्टी,डॉ. अमेय सोनवणे, डॉ.सुवदीत सेन यांनी पत्रकार परिषदेत दिली.