शिक्षकांच्या पगाराला विलंब, प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा आंदोलनाचा इशारा
schedule31 Dec 25 person by visibility 103 categoryशैक्षणिकमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एक तारखेला पगार होणे अपेक्षित असताना कोल्हापूर जिल्ह्यात सह राज्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे पगार न करण्याचा निर्णय झाला आहे. त्याविरोधात महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे शिष्टमंडळाने नवीन वर्षात शिक्षकांचे पगार थांबवू नका अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच यासंबंधीचे निवेदन शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांना दिले.
राज्यातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षणाधिकारी यांच्यावर कार्यवाही होत आहे. ही कार्यवाही चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे मत राज्यातील राजपत्रित अधिकारी संघटनेचे आहे.या कारवाईच्या निषेधार्थ राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे पगारावर सही न करण्याचा निणर्य घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सर्वच प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे नवीन वर्षात पगार रखडणार आहे. शिक्षकांचे पगार थांबवणे हे बाब शिक्षकांच्यावर अन्यायकारक असून तात्काळ शिक्षकांचे पगार करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे व जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील यांनी दिला आहे. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील,महिला जिल्हाध्यक्ष गिरीजा जोशी, जिल्हा सचिव नितीन पानारी, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहराध्यक्ष संतोष पाटील, शहर सचिव गणेश घनवट, महिला कार्याध्यक्ष मिनाज मुल्ला, विद्या बारामते यांच्यासह धीरज पारधी, गौतम कांबळे, धनंजय शिंदे, दशरथ कुंभार, संदिप डवंग, अजित मोळे उपस्थित होते.