+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडीवाय पाटील बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींची कंपन्यामध्ये निवड adjustपार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल adjustजिल्हा नियोजन समितीची सभा सहा जुलैला adjustबाजार समिती सभापतिपदी जनसुराज्यचे प्रकाश देसाई, उपसभापतिपदी सोनाली पाटील adjustजिप कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर adjustजिपतर्फे यशवंत सरपंच- ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर ! adjustकोल्हापूर जिपचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर adjustसुनीलकुमार लवटेंचे उच्च कोटीचं दातृत्व ! समाजकार्यासाठी एक कोटीचा निधी !! adjustकेआयटीच्या स्टार्टअपची दखल, सरकारकडून पाच कोटीचा निधी मंजूर adjustशिक्षक संघातर्फे जिप अधिकाऱ्यांचा सत्कार
1000474700
1000469021
Screenshot_20240226_195247~2
schedule28 May 23 person by visibility 635 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आरोग्य विभागातील वेगवेगळया पदावर ३४ वर्षाच्या सेवेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहायक व कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर मुरलीधर तथा एम. एम. भाट हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे महासचिव एम. एम. पाटील, बांधकाम विभागातील अधिकारी एम. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाट यांचा सत्कार झाला. मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी आरोग्य विभागात भाट यांनी केलेल्या सेवेचे कौतुक केले. महापूर आणि कोरोनाच्या कालावधीतील सेवेचाही गौरवोल्लेख केला. याप्रसंगी शोभा मनोहर भाट यांचाही सत्कार करण्यात आला. रत्नदीप सांस्कृतिक हॉल वाशी येथे कार्यक्रम झाला. कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आरोग्य सहायक एम. एम. भाट यांनी संघटनात्मक पातळीवरही काम केले आहे. करवीर तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्षपद जवळपास पंधरा वर्षे सांभाळले. १९८७ मध्ये आरोग्य सेवक म्हणून त्यांच्या नोकरीला सुरुवात झाली. बारा वर्षे या पदावर होते. करवीर तालुका, हातकणंगले तालुका आणि जिल्हा परिषद मुख्यालय येथे काम केले. आरोग्य सहायक म्हणून २२ वर्षे सेवा दिली. नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात यावर त्यांचा भर होता.
भाट हे मूळचे करवीर तालुक्यातील बाचणी येथील. त्यांच्यावर वारकरी संप्रदायांचा प्रभाव. त्यांना भजनाची गोडी. कुस्ती आणि कबड्डी आवडते खेळ. त्यांनी पुढाकार घेत गावात १९८९ मध्ये कबड्डी संघाची स्थापना केली. अनेक कबड्डुीपटू हे खेळातील कौशल्याने पोलिस दलात भरती झाले .संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना दिली. आरोग्य सहायक म्हणून महापूर आणि कोरोना काळात लोकांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा देता आले याविषयी समाधानी असल्याची भावना भाट यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीचे संचालक अमर पाटील, राहूल शेळके, संघटनेचे निवृत्त पदाधिकारी सुभाष इंदूलकर, संजय पुजारी, सुरेश सुतार, महेश वडर, सुहास माने, संदीप गणबावले, संगीता गुरव, संदीप पाटील यांच्यासह बाचणी ग्रामस्थ, जोतिर्लिंग विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.