+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल adjustजिल्हा नियोजन समितीची सभा सहा जुलैला adjustबाजार समिती सभापतिपदी जनसुराज्यचे प्रकाश देसाई, उपसभापतिपदी सोनाली पाटील adjustजिप कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर adjustजिपतर्फे यशवंत सरपंच- ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर ! adjustकोल्हापूर जिपचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर adjustसुनीलकुमार लवटेंचे उच्च कोटीचं दातृत्व ! समाजकार्यासाठी एक कोटीचा निधी !! adjustकेआयटीच्या स्टार्टअपची दखल, सरकारकडून पाच कोटीचा निधी मंजूर adjustशिक्षक संघातर्फे जिप अधिकाऱ्यांचा सत्कार adjustतर २७ जूनपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन - खंडेराव जगदाळे
1000474700
1000469021
Screenshot_20240226_195247~2
schedule10 May 24 person by visibility 3588 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा केमिस्ट अससोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली . उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी (आठ मे २०२४) जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ३९ जणांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. एकूण ३९ संचालकांची निवड झाली. 
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या .निवडणूक कार्यक्रमानुसार जर बिनविरोध झाली नसती तर १९ मे २०२४ रोजी मतदान व त्याचा दिवशी मतमोजणी होणार होती. परंतु अर्ज माघारी दिवशीच या निवडी बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाना यश आले व निवडणूका बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट रवि शिराळकर यांनी जाहीर केले.
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची  २०२४-२०२९ सालाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी  मदन पाटील , संजय शेटे,  शशिकांत खोत,  शिवाजी ढेंगे,  प्रल्हाद खवरे,  महेश सावंत,  सुरेश काटकर यांनी विशेष प्रयत्न केले.
निवड झालेले संचालक मंडळ खालील प्रमाणे :  कोल्हापूर शहर-  मदन कृष्णराव पाटील, संजय धनपाल शेटे, महेश सावंत, सुरेश काटकर,  दाजीबा पाटील, आदित्य चौगुले, विजय देवणे, कैवल्य कुलकर्णी, दीपक वाडकर यांचा समावेश आहे. करवीर तालुकातंर्गत शिवाजी यादव, अशोक पाटील, विकास पाटील तर हातकणंगले तालुक्यातून अशोक बोरगांवे, प्रल्हाद खवरे, भुजिंगराव भांडवले, सचिन पाटील, संतोष पाटील, सुनील पाटील, संजय हारगे यांची बिनविरोध निवड झाली. भुदरगड तालुका - शिवाजी ढेंगे , गजानन मिटके व शिरोळ तालुका - किरण दळवी, आप्पासाहेब काडगे, अमरसिह शिंदे यांची निवड झाली.
 गडहिंग्लज तालुका - संदीप मिसाळ, आनंदा क्षीरसागर तर कागल तालुका - मोहन ढेरे, नंदकुमार पाटील यंचा नूतन संचालकांत समावेश आहे. राधानगरी तालुका -  संभाजी कलिकते, सागर ढेरे, पन्हाळा तालुका - किरण जाधव, अशोक पाटील, शाहूवाडी तालुका -भरतेश कळंत्रे यांची बिनविरोध निवड झाली. चंदगड तालुका -  अनिल होनगेकर, आजरा तालुका - संजय हरेर, गगनबावडा तालुका -सुधीर डकरे हे संचालक आहेत. महिला संचालकपदी विद्याराणी चौगले, अश्विनी खाडे, अनुजा पाटील यांची निवड झाली.