Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !केआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपतीविनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधन

जाहिरात

 

अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!

schedule16 Nov 26 person by visibility 13 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: महापालिका निवडणुकीनंतर सभागृह अस्तित्वात आल्यावर गेली नऊ महिने एकमेकांविरोधात शह काटशहाचे राजकारण करणाऱ्या महापालिकेतील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी संयुक्तपणे सोमवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रशासनाविरोधात दंड थोपटले. निवडणुकीनंतर एक रुपयाचाही निधी विकासकामासाठी उपलब्ध करुन दिला नाही अशा शब्दात हल्लाबोल करत नगरसेवकांनी ‘विकासकामांसााठी आधी निधी…मग सभा’असा पवित्रा घेतला. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत मोठमोठयाने प्रशासनाच्या विरोधात आगपाखड केली. यामुळे गदारोळ निर्माण झाला. विषयपत्रिकेवर विषयांची जंत्री असताना सभा तहकूब करत महापालिका चौकात येऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. महाविकास आघाडीने प्रशासनाविरोधात निदर्शने केली. तर महायुतीच्या नगरसेवकांनी रस्त्याच्या दुर्देशेचे फलक फडकावित प्रशासनाच्या कामकाजाचा पंचनामा मांडला.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली महापालिकेची सर्वसाधारणा सभा १६ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. जवळपास अडीच महिन्यांनी होत असलेल्या या सभेच्या विषयपत्रिकेवर विविध विषयांची, सदस्य ठरावांची जंत्री होती. तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील अनाधिकृत बांधकामाच्या सध्यस्थितीच्या अनुषंगाने विषय होता. महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभेला सुरुवात झाली. सभेला सुरुवात होताच नगरसेवकांनी फेअरडीलचा विषय उपस्थित केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे फेअरडील प्रकरणी महापालिकेच्या विरोधात निकाल दिला. पुन्हा याचिका दाखल करण्यासाठी महापालिकेला पुन्हा कोट्यवधी रुपये मोजावे लागत आहेत. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रसंग उद्भवला असा आरोप केला.

दुसरीकडे नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध नाही. महापालिका निवडणुका होऊन नऊ महिन्याचा कालावधी उलटला.  विकासकामांसाठी दमडी दिली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहर विकासला ब्रेक बसत आहे. प्रशासनाकडून, नगरसेवकांना निधी मिळत नसेल तर सभेसाठी का उपस्थित  राहायचे, सभा कशासाठी घ्यायची असा सवाल करत नगरसेवकांनी ‘विकासकामांसाठी आधी निधी, मग सभा’असा इशारा प्रशासनाला दिला. महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रशासनाविरोधात एकत्र आवाज उठला.

प्रशासन निधी देत नाही तोपर्यंत सभा होऊ द्यायची नाही असा इशारा दिला. सभा तहूकब करुन दोन्ही बाजूचे नगरसेवक महापालिका चौकात आले. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. तर काहींनी प्रशासनावर टीकास्त्र सोडले सभागृह नेते मुरलीधर जाधव, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते शारंगध देशमुख, आदिल फरास, इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक विजेयंद्र माने, विजय देसाई, विजय खाडे¸ अमर समर्थ, काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, सुनील मोदी, अभिजीत खतकर यांनी निधीवरुन प्रशासनावर निशाण साधला. नगरसेवक उभे राहून प्रशासनाला निधीची विचारणा करू लागले. उपमहापौर अक्षय जरग, सभापती विशाल शिराळे, प्रा. जयंत पाटील, हे नगरसेवकांच्या बाजूनी उभे राहत प्रशासनाविरोधात उडी घेतली. प्रलंबित विकासकामे आणि निधीचा अभाव यामुळे तहूकब सभा गाजली.

………………

‘सभागृहाकडून प्रशासनावर विकासकामांसाठी निधी देत नाही असा जो आरोप झाला  तो चुकीचा आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे आणि ऐच्छिक निधी थांबवलेला नाही.’

-डॉ. राजेंद्र भारुड आयुक्त महापालिका कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes