अखेर ठरलं, कोल्हापुरात संजय मंडलिक, हातकणंगलेत धैर्यशील माने
schedule28 Mar 24 person by visibility 664 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार ? हा गेले अनेक दिवस लटकलेला विषय निकालात निघाला आहे. महायुती अंतर्गत शिवसेनेतर्फे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आली.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी दावा केला होता. त्यामुळे विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार की नाही अशी चर्चा रंगली होती. दुसरीकडे दोन्ही विद्यमान खासदारानी आपणाला तिकीट मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणाला शब्द दिला आहे असे ठामपणे सांगितले होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून रोज नवनवीन नावे चर्चेत येत होती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र गुरुवारी शिवसेना शिंदे गटाने जाहीर यादीमध्ये कोल्हापुरातून मंडलिक आणि हातकणंगलेमधून माने यांची नावे जाहीर झाली.