+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule29 Feb 24 person by visibility 160 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला रस्ता असो की महापालिकेने, त्याचा दर्जेदारपणा नेहमीच चर्चेचा ठरला आहे. अनेक ठिकाणी तर डांबरीकरणाच्या नावाखाली केवळ खडीकरणाचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून केलेले रस्ते किती दिवस टिकतात हा संशोधनाचा विषय ठरला असताना आणि शहरातील अनेक रस्ते उखडलेले असताना कोल्हापुरात मात्र एकाच रस्त्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीची तरतूद केली आहे. रस्ते कामात दोन्ही विभागांचा हा इंटरेस्ट वाहनधारक आणि नागरिकांत चर्चेचा ठरला आहे. रस्त्यांचे भाग्य उजळले, यंत्रणांची चांदी झाली अशा मिश्किल प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्य नगरोत्थान योजनेतून संभाजीनगर, कामगार चाळ ते निर्माण चौक, जरगनगर बस स्टॉपपर्यंतचा रस्त्यासाठी चार कोटी रुपयांची निधीची तरतूद आहे. महापालिकेच्या अखत्यारित हे काम होणार आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्माण चौक ते जरगनगर शेवटच्या बसस्टॉपपर्यंत रस्ता करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. दोन्ही विभागाकडून आता रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा हा राज्य सरकारच्या अखत्यारित काम करते. तर महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. दोन्ही विभाग अंतिमत: सरकारशी बांधिल. मात्र या दोन्ही विभागातील असमन्वय समोर आला आहे. शिवाय रस्ते कामातील इंटरेस्ट दिसून येत आहे.
…………………….
केवळ खडीकरण, डांबरीकरणाचा पत्ता नाही
शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात सध्या रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत. उपलब्ध निधी मुरवायचा म्हणून रस्ते दुरुस्तीची कामे होत आहेत.  नव्याने रस्ते तयार करताना पूर्वीचा रस्ता न उखडता त्यावर केवळ खडी टाकून काम पूर्ण केले जात असल्याचा दिखावा केला जात आहे. अनेक रस्त्यावर डांबरीकरणाचा पत्ता नाही. हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर पूलपर्यंतच्या रस्त्यावर केवळ खडीकरण झाले आहे. रामानंदनगर पूल ते निर्मिती चौकपर्यंतचा निम्मा रस्ता दुरुस्त केला आहे, निम्या रस्त्यावर खड्डे आहेत. पाचगावातही रस्त्यावर केवळ खडीचा थर दिसत आहे.