+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल adjustजिल्हा नियोजन समितीची सभा सहा जुलैला adjustबाजार समिती सभापतिपदी जनसुराज्यचे प्रकाश देसाई, उपसभापतिपदी सोनाली पाटील adjustजिप कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर adjustजिपतर्फे यशवंत सरपंच- ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर ! adjustकोल्हापूर जिपचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर adjustसुनीलकुमार लवटेंचे उच्च कोटीचं दातृत्व ! समाजकार्यासाठी एक कोटीचा निधी !! adjustकेआयटीच्या स्टार्टअपची दखल, सरकारकडून पाच कोटीचा निधी मंजूर adjustशिक्षक संघातर्फे जिप अधिकाऱ्यांचा सत्कार adjustतर २७ जूनपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन - खंडेराव जगदाळे
1000474700
1000469021
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Feb 24 person by visibility 332 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कराव्या लागणाऱ्या धावपळीत अनेक आजारांना तरुण वयातच आमंत्रण मिळते. भविष्यात बळवणाऱ्या आजारांचे संकेत शरीर वेळोवेळी देत असते. हे संकेत ओळखून त्याचवेळी या आजारांना प्रतिबंध केल्यास हे आजार डोके वर काढत नाहीत. यावर सखोल अभ्यास करून 
प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी' या नव्या उपचार पद्धतीचा बिईंग डॉक्टर क्लिनिकमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत, अशी माहिती, डॉ. युवराज पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाॅ. पोवार यांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही नवी संकल्पना समोर आणली आहे. यामध्ये त्यांनी शास्त्रीय आधारासोबत वैज्ञानिक पार्श्वभूमीचा चपखल वापर करत ही नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. त्यास आता वैद्यकीय क्षेत्रातून मान्यता मिळत असल्याने कोल्हापूरच्या मेडिकल त्यामुळे गतिमानता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .                                 या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही आजारापेक्षा त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय चांगले याचा विचार केला आहे. सध्या वयाच्या ४० वर्षांपुर्वीच अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हायपर टेंशन, मधुमेह अशा आजारांची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात. वेळीच ही लक्षणे लक्षात आल्यास भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो. एखादे वेळेस रक्तदाबाची गोळी सुरू होते. डायबेटिसचे पथ्यपाणी आणि औषधं सुरू करावी लागतात. किडनीचे विकार जाणवू लागतात आणि कधी कधी थायरॉईड सारखे आजार ही डोके वर काढू लागतात. या सर्वांना लाईफस्टाईल डीसिस म्हणून ओळखले जातात. या आजारांवर ही उपचार पद्धती अंमलात आणली असता या औषधांचे प्रमाण कमी कमी करत जाऊन बंद ही करता येतात. कमी वयात सुरू झालेला मधुमेह पूर्ण बरा होऊ शकतो तसेच त्याची औषधे ही पूर्णत थांबवता येऊ शकतो, याची बरीच उदाहरणे डॉ. युवराज पोवार यांनी दिली.
हायपर टेंशन, डायबेटिस, हृदय विकरासंबधी आजार, किडनीचे आजार आणि थायरॉईड अश्या आजाराचे आदीम (प्रायमोडियल) , प्राथमिक (प्रायमरी) , माध्यमिक (सेकंडरी), तृतीय व पुनर्वसन (रिहॅबिलेटेशन) अशा पाच स्तरांमध्ये विभाजन होते. त्यामधील आजाराच्या आदीम (प्रायमोडियल), प्राथमिक (प्रायमरी) आणि माध्यमिक (सेकंडरी) स्तरावर बिंईग डॉक्टर क्लिनिक काम करते.
सध्या मेटाबोलिक सिंड्रोमचे प्रमाण वाढते आहे. हायपर टेंशन, डायबेटिज, ह्रदयविकार संबधित आजार, किडनीचे विविध आजार, थायरॉईड हे आजार बळवताच दवाखान्यात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतात. मात्र प्रिव्हेंटीव कार्डिओलॉजी ही उपचार पद्धती घेतल्यास ९० टक्के लोकांना हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची गरज नाही. ओपीडी मध्येच उपचार झाल्यानंतर रुग्ण घरी जाऊ शकतो.सदरचे आजार होऊ नये यासाठी ९० टक्के प्रतिबंधात्मक उपचार केले जातात. तसेच भविष्यात या आजारातून निर्माण होणार शारीरिक त्रास (उदा. किडनी निकामी होणे, हृदय विकाराचा झटका येणे) ओळखून असे प्रसंग उद्भवू नयेत या पद्धतीने उपचार करता येतात .याला वैद्यकीय भाषेत प्रेडिक्टिव्ह रिस्क अर्थात संभाव्य धोका असे म्हंटले जाते.
बीपी, शुगर अशा आजारात घेण्यात येणारी औषधे कमी करणे तसेच ती काही वेळास पूर्णतः बंद करणे तसेच आजार थांबवणे अथवा वाढ न होण्यास प्रतिबंधात्मक उपचार या पद्धतीव्दारे केले जातात.
यामध्ये प्रामुख्याने मधुमेह नियंत्रित करणे, उच्च रक्तदाब असेल तर तो नियंत्रणात आणणे, आतील अवयवांना सूज येऊन आजार होणे तसेच जळजळ होणे यावर वेळीच उपचार केले जातात.
या आजारांची जोखिम किती मोठी आहे, त्याचा वेळीच अंदाज लावून त्या रोगाचे निदान केले जाते. तसेच वेळेत उपचारही केले जातात. 
 या पद्धतीने केले जाणारा उपचारावर आता विविध वैद्यकीय परिषदेमधूनही सादर केलेल्या शोधनिबंधात मान्यता मिळत आहे आणि त्याचबरोबर या संख्येत पेशंट ही बरे झाले आहेत त्यामुळे ही पद्धती ही कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राची नवीन ओळख ठरणार असून त्यामुळे कोल्हापूर सह पंचक्रोशीत मेडिकल टुरिझम वाढण्यास यामुळे गतिमानता येणार आहे , असा दावाही डॉ . युवराज पोवार यांनी केला आहे . प्रिव्हेंटिव्ह कार्डीओलॉजी उपचार पद्धतीच्या प्रबोधन प्रचारासाठी येत्या रविवारी दिनांक ११ रोजी म्युझिक लवर्स ग्रुपच्या वतीने अनोख्या सूर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे . शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे  पोवार आणि मुझिक लव्हर्स समुहाचे शिरीष पाटील यांनी केलेले आहे .