रोटरीच्या शालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule16 Aug 22 person by visibility 376 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ मिडटाउन फोनिक्स आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर फोंडेशन यांच्या वतीने आंतरशालेय अमृतमहोत्सवी रंगोत्सव चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा राम गणेश गडकरी सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत तब्बल 700 विद्याथ्यांेंनी उत्सफूर्तपणे सहभाग नोंदवला होता. यावेळी आदरणीय विजयमाला पेंटर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कलामहर्षी बाबूराव पेंटर फौंडेशनचे अजय मेस्त्री, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष राजेंद्र पोंदे, सारिका पोंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.