संपातील माघारीनंतर कर्मचारी कामावर रुजू
schedule21 Mar 23 person by visibility 657 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याकडे सकारात्मक नजरेने पाहत सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (२१ मार्च) कामावर रुजू झाले. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे गेले सात दिवस सरकारी कार्यालय शिक्षकांना जाणवत होता. मंगळवारपासून सगळे कर्मचारी पुन्हा हजर झाल्याने सरकारी कार्यालये गजबजली. विविध कामासाठी नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे.
दरम्यान संपातून माघार घ्यायची की संप पुढे चालू ठेवायचा या संदर्भात जिल्हा परिषदेच्या विविध केडरमधील कर्मचाऱ्यांच्यामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया होत्या. राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपातील माघारीच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद केडर मधील सर्व संघटना प्रतिनिधींची मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात बैठक झाली. या बर्थडे केक सरकारी निर्णयाचा सकारात्मकतेने विचार करत कामावर हजर होण्याचा निर्णय विविध केडरच्या संघटना प्रतिनिधींनी घेतला. तसे निरोप कर्मचाऱ्यांनाही पाठवले. यावेळी विविध केडरमधील संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महावीर सोळांकुरे, सचिन जाधव, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रणजीत पाटील, अजय शिंदे, उत्तम वावरे, एम.एम.भाट, स्वप्निल घस्ते , निलेश महाळुंगेकर, अश्विन धारवाडकर, अजित मगदूम, संजय शिंदे, साताप्पा मोहिते कुमार कांबळे, अशोक पाटील, संजय रणदिवे, अलका पाटील आदी उपस्थित होते.